३ नोव्हेंबरला विशेष फेरी
सिल्लोड, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त तालुक्यातील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेत २६ हजार ९३७ बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या.
अपेक्षित २८ हजार ६२९ लाभार्थ्यांपैकी १ हजार ६९२ विद्यार्थी वंचित राहिले. या विद्यार्थ्यांसाठी ३ नोव्हेंबरला विशेष फेरी राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा यांनी दिली. डॉ. अभय धानोरकर, विकास मेश्राम आणि डॉ. चावडा यांच्या मार्गदर्शनाखाली जरंडी, बनोटी व सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ६ अधिकारी, १९ पर्यवेक्षक आणि ३३६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. १५७ अंगणवाड्या आणि १२४ प्राथमिक शाळांचा समावेश होता.
-- जरंडी केंद्राची कामगिरी सर्वाधिक --
जरंडी केंद्रात १२,२२९ पैकी १२, १४९, बनोटी केंद्रात ११,७०० पैकी ११,१३८, तर सावळदबारा केंद्रात ४,७०० पैकी ३,६५० बालकांना गोळ्या देण्यात आल्या.















